Astrology Tips: सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण इतक्या घाईत असतो, की त्याला अरे बाबा जरा सावकाश... असा सल्लाही द्यायला भीती वाटते. घड्याळाच्या काट्यावर जगत असलेले तुम्हीआम्ही या साऱ्यामध्ये नकळतच काही गोष्टींना विसरुन जातो. पण, जेव्हा या गोष्टी लक्षात येतात तेव्हा मात्र पश्चातापाचीही वेळ आपल्याकडे नसते. वाटेनं दररोज चालत असतानाही असंच काहीसं होतं.
आपण ज्यावेळी घरातून एखाद्या ठिकाणी किंवा अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी निघतो त्यावेळी नकळतच कितीतरी गोष्टी मागे टाकून जात असतो. पण, तुम्हाला माहितीये का काही अशाही गोष्टी आहेत ज्या आपण वाटेनं जात असताना कधीच ओलांडू नयेत. आता तुम्ही म्हणाल आम्ही आता तेसुद्धा पाहायचं होय? प्रत्येक वेळी लक्षात राहील असं नाही, पण काही प्रसंगी मात्र या गोष्टींना ओलांडणं टाळावं. अन्यथा सुखासमाधानाच्या आयुष्यामध्ये काही चित्रविचित्र घटना तुम्हाला हैराण करतील. तर, मग एकदा पाहूनच घ्या रस्त्यानं चालत असताना नेमकं काय ओलांडू नये....
तुम्हाला जर वाटेत खिळे दिसले तर जरा जपून. अनेकदा घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी काही उपाय करताना काहीजणांकडून अशा गोष्टींचा वापर करून त्या उघड्यावर फेकल्या जातात. त्यामुळं घोड्याची नाल, खिळे आणि तत्सम लोखंडी वस्तूंपासून सावध राहा.
पूजासाहित्य
अनेकदा घरातील पूजासाहित्य अजाणतेपणे समुद्रकिनारी किंवा रस्त्यावर फेकलं जातं. अशा गोष्टींना ओलांडू नका किंवा त्यांना पायही लावू नका. एखाद्या क्षणी तुमचा या गोष्टींना पाय लागल्यास हात जोडून नमस्कार करून पुढे जा.
लिंबू- मिरची
घर किंवा दुकानाला कुणाची दृष्ट लागू नये यासाठी लिंबू मिरची टांगल्याचं तुम्ही पाहिलं असेल. जर तुम्ही वाटेवर असंकाही पाहिलं तर ते ओलांडू नका. अडचणी वाढू शकतील.
केसांचा पुंजका
वाटेनं चालत असताना तुम्हाला एकाएकी केसांचा पुंजका दिसला तर हे अशुभ मानलं जातं. केसांच्या पुंजक्याचा संबंध थेट राहूशी असतो. त्यामुळं तुम्हाला असं काही दिसलं तर ते ओलांडू नका. त्याच्या बाजूनं निघून जा.
अन्नपदार्थ
एखाद्या चौकात किंवा तीन रस्ते एकत्र येतात तिथं, किंवा कुठेही वाटेच अन्न पडलेलं दिसलं तर ते ओलांडू नका, त्याला स्पर्शही करू नका. असं केल्यास जीवनाच चित्रविचित्र घटना घडतील. प्रसंगी त्या हाताबाहेरही जातील.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)