Vastu Tips For Shoes And Slippers: सनातन धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार जर आपण घरामध्ये दिशेनुसार योग्य ठिकाणी वस्तू ठेवल्या नाहीत तर नकारात्मक शक्तींचे वर्चस्व वाढते आणि घरामधील वातावरण आणि घरातील व्यक्तीचा आयुष्यात चुकीचा गोष्टी घडू शकतात. एवढंच नाही तर कुटुंबात दारिद्रसुद्धा येऊ शकते. वास्तुशास्त्रामध्ये घरात पायातील चप्पल ठेवण्याची ठिकाण देखील कोणत्या जागी असायला हवे हे यात सांगण्यात आले आहे. वास्तूनुसार, घरात चुकीच्या ठिकाणी बूट आणि चप्पल काढून आपण स्वतः गरिबीला आपल्या घरी बोलावत असतो.
वास्तुशास्त्रात सांगितले आहे की घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळेच मुख्य दरवाजा सुंदर असावा यासाठी अधिक लक्ष दिले जाते. मात्र अनेकजण घराच्या मुख्य दारासमोर चप्पलचा ढीग लावतात. वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे. असे केल्याने घरामध्ये लक्ष्मीचे आगमनही थांबते. त्यामुळे लक्षात ठेवा चुकूनही कधी घराच्या मुख्य दारासमोर शूज काढू नका.
चुकूनही शू रॅक बेडरूममध्ये ठेवू नयेत, शिवाय चप्पल, शू देखील बेडरूममध्ये ठेवू नयेत. असे म्हटले जाते की शू रॅक जर बेडरुममध्ये ठेवले तर पती-पत्नीच्या नात्यावर चूकीचा परिणाम होतो आणि घरात वाद होतात. काही वेळा पती-पत्नीचे नाते तुटण्याच्या टोकाला पोहोचते. त्यामुळे कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका.
वास्तुशास्त्रामध्ये घरात कोणत्या दिशेला शूज आणि चप्पल काढणे टाळावे या बद्दल विशेष माहिती दिली आहे. विशेषतः ईशान्य दिशेला शूज आणि चप्पल चुकूनही काढू नयेत. असे केल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागते आणि कुटुंब कर्जबाजारी होते. त्याऐवजी शूज आणि चप्पल घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकता. यासाठी या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.