Horoscope 2024 : नवीन वर्षात 2024 मध्ये 1000 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! राहु, शनि व गुरु 'या' राशींना करणार मालामाल

Horoscope 2024 : तब्बल 1000 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये दुर्मिळ योग तयार होतो आहे. गुरु, शनि आणि राहु यांच्या संयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Dec 13, 2023, 03:06 PM IST
Horoscope 2024 : नवीन वर्षात 2024 मध्ये 1000 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! राहु, शनि व गुरु 'या' राशींना करणार मालामाल title=
Horoscope 2024 A rare coincidence after 1000 years in New Year 2024 Rahu Shani and Jupiter will give wealth to these zodiac signs

Horoscope 2024 : अवघ्या काही दिवसांमध्ये आपण नवीन वर्षात पाऊल ठेवणार आहोत. नवीन वर्ष आपल्यासाठी कसं असेल हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2024 हे वर्ष 12 राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे याबद्दल सांगितलं आहे. नवीन वर्षात गुरु, शनि आणि राहु हे अतिशय महत्त्वाचे आणि खास ग्रह यांच्या तब्बल  सुमारे 1000 वर्षांनंतर संयोग घडणार आहे. या दुर्मिळ योगायोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. कुठल्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या. (Horoscope 2024 A rare coincidence after 1000 years in New Year 2024 Rahu Shani and Jupiter will give wealth to these zodiac signs) 

मेष रास (Aries Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप चांगल सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं सहज शक्य होणार आहे. यासोबतच फेब्रुवारीपासून तुमच्या करिअरमध्ये चढता क्रम पाहता येणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नवीन वर्षात मिळणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला प्रमोशनसोबत इन्क्रीमेंट मिळणार आहे. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होणार आहात. तुमच्या कुटुंबासोबतही तुम्ही आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. लव्ह लाईफमध्ये सकारात्मक बदल दिसणार आहे. तर अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येणार आहे. आरोग्यबाबतही नवीन वर्ष चांगल असणार आहे. मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात थोडे सावध राहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

या राशीत शनीची शेवटची साडेसाती चालू असल्याने या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. ज्यामुळे तुम्हाला नफ्यासोबतच पैशांची बचत करण्यात मदत होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात. आरोग्यही चांगले राहणार आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासूनही तुम्हाला दिलासा मिळणार आहे. तुम्हाला मान-सन्मानासह धन-संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनातही आनंद असणार आहे. नात्यातील दीर्घकालीन समस्या 2024 मध्ये संपुष्टात येणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. आत्मविश्वास आणि धैर्यात वाढ होणार आहे. याच्या मदतीने तुम्ही अनेक क्षेत्रात यश प्राप्त करणार आहात. व्यवसायातही भरपूर नफा मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही आव्हानांवर मात करुन यशाची पायरी चढणार आहात. 

हेसुद्धा वाचा - Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट

मीन रास (Pisces Zodiac)

राहू या राशीच्या पहिल्या घरात स्थित असल्याने तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होणार आहे. कमालीच्या आत्मविश्वासामुळे ते प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर सहज मात करु शकणार आहात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळणार आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सुवर्णसंधीही मिळणार आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत. अशा परिस्थितीत खर्च वाढू शकतो. शनीच्या कृपेने परदेशातील व्यवसायात नफा मिळणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नवीन वर्षात असे करणे तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)