श्रावणात जुळून येतोय गजकेसरी योग! 'या' 3 राशींच्या नशिबात मोठे पद, पैसा आणि प्रगती

Gajakesari Yoga : यंदाचा श्रावण महिना अतिशय खास आहे. अधिक मासासोबत श्रावण महिना असा दुहेरी योग आला आहे. तीन राशी श्रावण खूप भाग्यशाली ठरणार आहे. कारण गजकेसरी योगामुळे आर्थिक लाभाचा अतिशय शक्तिशाली योग निर्माण झाला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 19, 2023, 04:56 PM IST
श्रावणात जुळून येतोय गजकेसरी योग! 'या' 3 राशींच्या नशिबात मोठे पद, पैसा आणि प्रगती title=
gajakesari yoga made in sawan mesh mithun kark 7 August three zodiac get money promotion

Positive Zodiac Effects Of Gajakesari Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रात 32 राजयोग आहेत. त्यातील सर्वात शक्तिशाली योग म्हणजे गजकेसरी राजयोग श्रावणात तयार होणार आहे. बृहस्पति म्हणजे गुरु आणि चंद्र यांच्या संयोगाने गजकेसरी राजयोग तयार होतो. या राजयोगामुळे काही राशींच्या नशिबात आर्थिक लाभाचे योग जुळून येतात. कधी आहे गजकेसरी राजयोग आणि कुठल्या राशीच्या लोकांना याचा लाभ होणार हे जाणून घेऊयात. (gajakesari yoga made in sawan mesh mithun kark 7 August three zodiac get money promotion)

कधी आहे गजकेसरी योग?

श्रावणात 7 ऑगस्टला हा गजकेसरी राजयोग तयार होतो आहे. धनाचा कारक गुरू आणि मनाचा कारक चंद्र यांच्या मिलनाने हा अतिशय शुभ असा योग जुळून येतो. हा योग गजाप्रमाणे शक्ती आणि संपत्ती जाचकाला प्रदान करतो. 7 ऑगस्टला चंद्र मेष राशीत प्रवेश करेल आणि गुरूसोबत गजकेसरी योग तयार करेल. हा गजकेसरी योग 9 ऑगस्टपर्यंत सकाळी 7:43:02 पर्यंत असणार आहे. 

'या' राशी होणार शक्तिशाली आणि धनवान

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग शुभदायक ठरणार आहे. या लोकांना कामाच्या ठिकाणी मोठं पद मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. व्यवसायिकांसाठी हा शुभ काळ असून नवीन करार तुम्हाला लाभदायक ठरेल. तुमची आर्थिक स्थिती चांगल्या स्थितीत येणार आहे. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याचे योग आहे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मिथुन (Gemini)

गजकेसरी योग तुमच्या नशिब बलवान करणार आहे. तु्म्हाला 9 ऑगस्टपर्यंत अनेक लाभ होणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा सुवर्ण काळ ठरणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या स्थितीत येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. नवीन कामासाठी हा काळ उत्तम असेल. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग अतिशय शुभ ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा चांगला काळ असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. कौटुबिक सहकार्यामुळे व्यवसाय मजबूत स्थितीत येणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला गवसणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. पगारवाढीचे संकेत आहेत. करिअरसाठी हा चांगला काळ असणार आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Shani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 3 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार संकट

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)