Shukra Vakri : 4 दिवसांनंतर 7 राशींचे 'अच्छे दिन' ! शुक्र वक्रीमुळे बँक बॅलन्समध्ये भरभराट

Venus Transit : शुक्र ग्रह येत्या 23 जुलैला सकाळी 6.01 वाजता कर्क राशीत गोचर करणार आहे. तो कर्क राशीमध्ये 7 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. शुक्र वक्रीमुळे 7 राशींचे आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 19, 2023, 05:00 PM IST
Shukra Vakri : 4 दिवसांनंतर 7 राशींचे 'अच्छे दिन' ! शुक्र वक्रीमुळे बँक बॅलन्समध्ये भरभराट title=
shukra vakri 2023 in kark Venus go retrograde 7 zodiac signs there will be rain of torn notes

Vakri Shukra 2023 in Kark :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती, विलास, प्रेम आणि सौंदर्याचा कारक शुक्र ग्रह लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा एका घरातून दुसऱ्या घरात जातो तेव्हा तेव्हा जाचकाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत असून तो 23 जुलैला वक्री स्थितीत येणार आहे. 23 जुलैला सकाळी 6.01 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार असून या ठिकाणी तो पुढील 7 ऑगस्ट 2023 पर्यंत राहणार आहे. 

शुक्राच्या प्रतिगामी गतीचा सर्व राशींच्या लोकांवर मोठा प्रभाव पडणार असून 7 राशीचे आयुष्यात अच्छे दिन येणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांसाठी देार शुभदायक फळ जाणून घेऊयात. (shukra vakri 2023 in kark Venus go retrograde 7 zodiac signs there will be rain of torn notes )

मेष (Aries)

शुक्र गोचरमुळे या राशीच्या आयुष्यातील प्रेमसंबंध मजबूत होणार आहे. नात्यासंबंधाबद्दल तुम्ही गंभीर असाल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होईल. तर करिअरच्या दृष्टीकोनातून हा काळ अतिशय फलदायी ठरणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होईल. 

वृषभ (Taurus)

घरात काही शुभ कार्य ठरणार असून घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. नोकरदारांसाठी हा काळ शुभ असणार आहे. व्यवसायिकांनी थोडी मेहनत केली की अनेक फायदे त्यांना दिसून येतील. मात्र मालमत्तेबाबी समस्यांसाठी कोर्टाची पायरी चढावी लागेल. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांची लव्ह लाइफ एकदम जोरदार असणार आहे. प्रेमच प्रेम तुमच्या आयुष्यात असेल. कामाच्या ठिकाणी तुमचं काम छान होणार आहे. प्रवासातून तुम्हाला लाभाचे योग आहेत. आर्थिक फायद्यामुळे मन प्रसन्न होईल. घरात आनंदाचं वातावरण असेल.  

कर्क (Cancer) 

शुक्र गोचरमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या स्वभावाने तुम्ही लोकांची मनं जिंकणार आहात. उत्पन्नाचे साधन वाढणार आहे. बँक बॅलन्स वाढता असणार आहे. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोक कामाच्या ठिकाणी यश आणि प्रगती साधणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. व्यवसायिकांसाठीही हा उत्तम काळ असणार आहे. मात्र हट्टीपणा स्वभावाला मुरळ घालावी लागेल. रोमान्सचा तुमच्या आयुष्यात प्रवेश होणार आहे. 

कन्या (Virgo)

शुक्र वक्रीचं परदेशात काम करणाऱ्याना अधिक फायदा होतो. त्याशिवाय परदेशात जाणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. इतर राज्यात प्रवासाचे योग आहेत. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. मन प्रसन्न होणार आहे. 

तूळ (Libra)

शुक्र गोचरमुळे उत्पन्नात वाढणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. आत्मविश्वास वाढणार आहे. व्यवसायात सामाजिक संपर्काचा फायदा होणार आहे. गुंतवणुकीचा फायदा होईल.

 

हेसुद्धा वाचा - Shani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 3 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार संकट

 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )