Panchang 06 September 2024 in marathi : आज भाद्रपद महिन्यातील पहिला सण हरतालिका म्हणजेच हरतालिका तीज आहे. माता पार्वती आणि महादेवाची आराधना करण्याचा हा दिवस असतो. हे व्रत निर्जल ठेवण्यात येतं आणि दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. वैवाहिक महिला नवऱ्याचा दीर्घयुष्यासाठी करतात. तर तरुणी मुली हे व्रत मनासारखा नवरा मिळावा यासाठी करतात.
आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतिया तिथी आहे. पंचांगानुसार बुधादित्य राजयोग, शुक्ल योग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कन्या राशीत भ्रमण करत आहे. (friday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यात आज हरतालिका म्हणजे आता माता लक्ष्मीसह माता पार्वती आणि महादेवाची उपासना करण्यात येणार आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (friday panchang 06 September 2024 panchang in marathi Bhadrapada 2024 hartalika hartalika teej)
वार - शुक्रवार
तिथी - तृतीया - 15:03:35 पर्यंत
नक्षत्र - हस्त - 09:25:42 पर्यंत
करण - गर - 15:03:35 पर्यंत, वणिज - 28:22:43 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शुक्ल - 22:13:58 पर्यंत
सूर्योदय - 06:01:46
सूर्यास्त -18:36:19
चंद्र रास - कन्या - 23:01:02 पर्यंत
चंद्रोदय - 08:37:00
चंद्रास्त - 20:15:00
ऋतु - शरद
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:34:33
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त - 08:32:40 पासुन 09:22:58 पर्यंत, 12:44:11 पासुन 13:34:29 पर्यंत
कुलिक – 08:32:40 पासुन 09:22:58 पर्यंत
कंटक – 13:34:29 पासुन 14:24:48 पर्यंत
राहु काळ – 10:44:43 पासुन 12:19:02 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:15:06 पासुन 16:05:24 पर्यंत
यमघण्ट – 16:55:42 पासुन 17:46:00 पर्यंत
यमगण्ड – 15:27:40 पासुन 17:01:59 पर्यंत
गुलिक काळ – 07:36:05 पासुन 09:10:24 पर्यंत
अभिजीत - 11:53:53 पासुन 12:44:11 पर्यंत
पश्चिम
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)