जळगाव : शिरसोलीसारख्या छोट्याशा गावातल्या मुलांनी काही भन्नाट उपकरणे तयार केली आहेत. बारी विद्यालयाच्या मुलांनी काहीतरी भन्नाट करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांना साथ मिळाली विज्ञानचे शिक्षक सतीश पाटील यांची. टाकाऊ पासून टीकाऊ वस्तू कशा बनवायच्या हे यांच्या कडून शिकल पाहीजे.
चुंबकावर चालणारा रेडिओ, भंगारातल्या जुने रेडिओपासून एफएम, चष्म्याच्या काचांन पासून दुर्बिण, पेपर डीशचा स्पीकर या सारखी अनेक उपकरणं या शाळकरी मुलानी साकारली आहे.
शहरातल्या मुलांसारखं मोबाईल, टीवीवर वेळ वाया न घालवता हया मुलांनी कल्पनांना प्रत्यक्षात आणलं आणि याचं श्रेय जातं सतीश पाटील यांना. हया अनोख्या प्रयोगशाळेची सूरवात चष्म्याच्या काचा, जुने ब्लेड, लाकडी फळ्यांचे तुकडे, तारा, अशा अनेक टाकावू वस्तू गोळा करण्यापासून.
शहरातल्या शाळांमध्ये प्रयोगशाळा असूनही मुले त्याचा वापर करत नाही तेच दूसरीकडे प्रतिकूल परिस्थितीतही प्रयोगशील कसे राहावे हे या शाळा आणि मुलांनकडून शिकावे. दर रविवारी ही प्रयोगशाळा भरते आणि सतीश पाटील मूलांना मार्गदर्शन करतात.
महाग साधनसामग्री वापरलेली नाही
विद्यार्थ्यांनी साकारलेली आणखी काही भन्नाट उपकरणे-
विजेशिवाय चालणारा रेडिओ,सेकंदात चार्ज होणारी बॅटरी,यांत्रिक हातोडा,आवाज न करणारे ड्रील मशीन,पवनचक्की,विजेचा दिवा,विशिष्ट वेळेनंतर आपोआप बंद करणारा टायमर स्विच,हँड इलेक्ट्रिक जनरेटर,कोणतंही स्टेशन कॅच करणारी दूरसंवेदी एरियल,सेकंदात चुंबक तयार करणारं यंत्र,नळाच्या पाण्यावर मोबाइल चार्ज (नळाच्या धारेवर पवनचक्कीचं पातं बसविल्यानंतर),चालत्या वाहनावर मोबाइल चार्ज,पेन्सिल सेलवरील विद्युत मोटार,सूक्ष्मदर्शक यंत्र,नोटा तपासणारं यंत्र,पाणी शुद्धीकरण यंत्र,तारायंत्र.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.