ट्विटरवर भरणार पहिले मराठी #ट्विटर_संमेलन

मुंबई : मराठी भाषेला साहित्य संमेलनाची समृद्ध परंपरा लाभली आहे.

Updated: Jan 14, 2016, 04:07 PM IST
 ट्विटरवर भरणार पहिले मराठी #ट्विटर_संमेलन title=

मुंबई : मराठी भाषेला साहित्य संमेलनाची समृद्ध परंपरा लाभली आहे. उद्यापासून ८९व्या मराठी साहित्य संमेलनालाही पिंपरी-चिंचवड येथे  सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्यापासून ट्वीटरवरही 'पहिले मराठी #ट्विटर_संमेलन' भरणार आहे. 

  तुम्ही समजा कथा लिहीत असाल, कविता करत असाल, एखादे चांगले पुस्तक वाचले असेल, तुमचा स्वतःचा ब्लॉग असेल, एखाद्या बोलीभाषेबद्दल माहिती असेल आणि हे सर्व तुम्हाला शेअर करायचे असेल तर तुम्ही या संमेलनाचा भाग होऊ शकता.

 या संमेलनाचा कोणी एक आयोजक नाही की एक अध्यक्ष नाही; त्यामुळे वादही नाहीत. ट्विटरवरील मराठी बांधवांनीच एकत्र येऊन याची सुरूवात केलीये.

 यात #ट्विटर_संमेलन, #माझीकविता, #माझेविचार, #माझीकथा, #माझीबोलीभाषा, #माझाब्लॉग, #साहित्यसंमेलन, #पुस्तकपरिचय, #लेखकपरिचय, #सध्यावाचतोय असे विषयांना अनुरुप १२ हॅशटॅग आहेत. यातील कोणताही एक हॅशटॅग वापरुन ट्वीट करायचंय.  

मराठी साहित्य संमेलनाच्या काळात म्हणजेच १५-१८ जानेवारी या तारखांना हे संमेलन भरणार आहे.