www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या पोटावर पाय आणले आहेत. त्यामुळे आम्ही रिक्षाबंदचे हात्यार उपासल्याची प्रतिक्रिया मुंब्रा येथील रिक्षाचालकांनी व्यक्त केली.
रमझानच्या सणानिमित्त मुंब्रा स्टेशनपर्यंतचा प्रवास सुकर व्हावा यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी रविवारपासून सहा खासगी बस सुरू केल्या आहेत. रमझान संपेपर्यंत म्हणजे पुढील जवळपास ३३ दिवस या बस मुंब्रा स्टेशन ते शिळफाटा या मार्गावर मोफत प्रवासी सेवा देणार आहेत. याचा लाभ मुंब्र्यातील नागरिकांनी घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे रिक्षा चालंकाच्या व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे रिक्षाचालंकानी बंदचे हत्यार उपसले.
आव्हाड यांनी रमझान सणासाठी मुंब्य्रात सुरू केलेल्या मोफत बस सेवेमुळे आमचा रोजगार बुडत आहे. यामुळे आम्हाला रोजगार कसा मिळणार. यात राजकारण केले गेल्याचा आरोप काही स्थानिक रिक्षाचालकांनी करत सोमवारी रिक्षा बंद आंदोलन केले. काही ठराविक वेळेत ही मोफत सेवा सुरू ठेवण्याचे आश्वासन आव्हाड यांच्याकडून मिळाल्यानंतर रिक्षाचालकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही दिवस या बस फक्त संध्याकाळच्या वेळेत चालवल्या जातील. परंतु, रमझानजवळ आल्यानंतर मात्र, दिवसभर त्या लोकांच्या सेवेत असतील, असे आव्हाड यांनी सांगितले. त्यानंतर हे रिक्षा बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.