जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये सरफराजला मारण्यासाठी धावला उथप्पा

क्रिकेटच्या मैदानावर वाद होणे ही काही नवी गोष्ट नाही. अनेकदा मैदानावर खेळाडूंमध्ये वाद होत असतात. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात पुणे आणि मुंबईच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यांच्या वादाचा मुद्दा चांगलाच गाजला.

Updated: May 2, 2016, 03:44 PM IST
जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये सरफराजला मारण्यासाठी धावला उथप्पा title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर वाद होणे ही काही नवी गोष्ट नाही. अनेकदा मैदानावर खेळाडूंमध्ये वाद होत असतात. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात पुणे आणि मुंबईच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यांच्या वादाचा मुद्दा चांगलाच गाजला.

त्यांच्या वादामुळे सामन्यातील वातावरण चांगलेच तापले. हे काही यंदाच्याच हंगामात घडले असे नाही. गेल्या हंगामातही केकेआरचा क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा बंगळुरुचा क्रिकेटपटू सरफराज खानशी भांडला होता. ही घटना जेव्हा क्रिस गेल आऊट झाल्यानंतर सरफराज मैदानावर ड्रिंक्स घेऊन आला तेव्हा त्याचे उथप्पाशी भांडण झाले. पुढील चार बॉलनंतर मॅच संपली आणि बंगळूरु जिंकली. 

यानंतर ड्रेसिंग रुममध्ये उथप्पाने सरफराजबाबत अपशब्द वापरले तसेच त्याला मारायलाही धावला होता. मात्र त्याचवेळी इतर खेळाडूंनी मध्यस्थी करुन सावरले.