दुखापतीमुळे स्मिथही पुणे संघातून बाहेर

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर धोनीच्या पुणे संघाला मोठा झटका बसलाय. रायजिंग पुणे सुपरजायंटचा क्रिकेटपटू स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून बाहेर पडलाय. 

Updated: May 2, 2016, 11:25 AM IST
दुखापतीमुळे स्मिथही पुणे संघातून बाहेर title=

मुंबई : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर धोनीच्या पुणे संघाला मोठा झटका बसलाय. रायजिंग पुणे सुपरजायंटचा क्रिकेटपटू स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून बाहेर पडलाय. 

रविवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात स्मिथने २३ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या. या सामन्यादरम्यान त्याच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला सामन्याबाहेर व्हावे लागले. त्यानंतर संघानेही स्मिथ यंदाच्या सीझनमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. 

स्मिथपूर्वी पुणे संघातून केविन पीटरसन आणि फाफ डू प्लेसिस हे क्रिकेटपटू दुखापतीमुळे आधीच बाहेर झालेत. लवकरच स्मिथ मायदेशी परतणार आहे. तेथे सिडनीमध्ये त्याच्या दुखापतीची तपासणी केली जाईल.