अॅडलेड : वर्ल्डकपमध्ये सलग पाचव्या वेळेस भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचं लक्ष्य ठेवलं.
मात्र या धावसंख्येचा पाठलाग करत पाकिस्तान टीम रडत-खडत २२५ पर्यंतच पोहोचली आणि सामना टीम इंडियाने खिशात घातला.
भारत-पाकिस्तानचा हा सामना सुरूवातीच्या टप्प्यात रोमांचकारी होता.
उमेश यादवने पहिल्याच षटकात शहजाद आणि नंतर शोएब मकसूदला माघारी धाडले, तो क्षण
शिखर धवन आणि विराट कोहलीने शतकी भागीदारी साजरी केली आणि टीम इंडियाची धावसंख्या पुढे नेली.
धवनने पाकिस्तानविरुद्ध ७६ चेंडूत ७३ धावा काढल्या, मात्र त्यानंतर धवन रन आऊट झाला.
मिसबाह पाकिस्तानचा रथ एकटाच ओढत असल्याचं चित्र होतं, मात्र मिसबाहही ७४ धावांवर बाद झाला. या दरम्याने त्याने केलेली फलंदाजी पाकिस्तानच्या आशा वाढवणारी होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.