रोहित शर्मा १३ डिसेंबरला लग्नाच्या बोहल्यावर

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना, हरभजन सिंग लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतर स्टार क्रिकेटर रोहित शर्माही विवाहबद्ध होतोय. येत्या १३ डिसेंबरला रोहित त्याची प्रेयसी रितीका सचदेव हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. 

Updated: Dec 11, 2015, 01:10 PM IST
रोहित शर्मा १३ डिसेंबरला लग्नाच्या बोहल्यावर title=

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना, हरभजन सिंग लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतर स्टार क्रिकेटर रोहित शर्माही विवाहबद्ध होतोय. येत्या १३ डिसेंबरला रोहित त्याची प्रेयसी रितीका सचदेव हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. 

मुंबईच्या वांद्रेस्थित ताज लँड हॉटेलमध्ये या दोघांचे लग्न होणार आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावरही व्हायरल झालीय.

रोहितच्या लग्नात अनेक व्हीआयपी उपस्थित राहणार असल्याची बातमी आहे. गेल्या सहा वर्षांपासून रोहित आणि रितीकाचे प्रेमसंबंध आहेत. २०१५च्या वर्ल्डकप दरम्यान हे कपल पहिल्यांदा दिसले होते. त्यानंतर २८ जुलै या दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याचीही चर्चा रंगली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.