रंगला हरभजन-गीताचा मेहंदी सोहळा, फोटो वायरल

क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा उद्या २९ ऑक्टोबरला विवाह आहे. त्यापूर्वी काल मेहंदी समारंभ पार पडला. गीता आणि हरभजन यांनी आपला मेहंदी सोहळा खूप एंजॉय केल्याचं फोटोंवरून दिसतंय.

Updated: Oct 28, 2015, 09:21 AM IST
रंगला हरभजन-गीताचा मेहंदी सोहळा, फोटो वायरल title=

जालंधर: क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा उद्या २९ ऑक्टोबरला विवाह आहे. त्यापूर्वी काल मेहंदी समारंभ पार पडला. गीता आणि हरभजन यांनी आपला मेहंदी सोहळा खूप एंजॉय केल्याचं फोटोंवरून दिसतंय.

सोशल मीडियावर मेहंदी समारंभाचे काही फोटो शेअर करण्यात आलेत. यात गीतानं गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा लहंगा-चोली ड्रेस घातला. त्यात ती खूप सुंदर दिसतेय. 

आणखी वाचा - किक्रेटर हरभजन, गीता बसराच्या लग्नाची तारीख ठरली

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या समारंभानंतर चूडा सेरेमनीसाठी गीतासाठी खास ऑरेंज रंगाचा सिल्कचा ड्रेस डिझाइन केला गेलाय. गीता बसरा लग्नात लाल आणि गोल्डन रंगाचा लाचा घालणार आहेत. तर रिसेप्शनमध्ये गीता निळ्या रंगाच्या लहंग्यात दिसेल. 

लग्नसमारंभ पाच दिवस चालले. यात संगीत, मेहंदी, फेरे, रिसेप्शन सारखे समारंभ आहेत. रिसेप्शन दिल्लीत १ नोव्हेंबरला आहे. रिसेप्शनला क्रिकेट, बॉलिवूड आणि बिझनेस क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, प्रियंका चोपड़ा, अक्षय कुमार, हृतिक रोशन, राहुल गांधी, नीता आणि मुकेश अंबानी सहभागी असतील, असं कळतंय. 

आणखी वाचा - आजकल या अभिनेत्रीसोबत डेटिंग करत आहे युवराज!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.