Hindu Ritual: लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात? श्रद्धा नाही तर सुंदर परंपरा, कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

Newlyweds Go to Jejuri After Marriage : लग्नानंतर नवीन जोडप देवदर्शनासाठी जातात. बरीच जोडपी ही जेजुरीला जातात. यामागील कारण तुम्हाला माहितीये का? 

नेहा चौधरी | Updated: Jan 10, 2025, 08:40 PM IST
Hindu Ritual: लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात? श्रद्धा नाही तर सुंदर परंपरा, कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित  title=

Newlyweds Go to Jejuri After Marriage : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येक राज्याची आपली परंपरा आणि प्रथा आहे. इथे लग्नाच्या वेगवेगळ्या रितीरिवाज पाहिला मिळतात. महाराष्ट्रात लग्नाबद्दल अनेक सुंदर आणि प्राचीन परंपरा आहेत. ज्या आजही मोठ्या उत्साहाने पाळल्या जातात. अशा अनेक प्रथा आहे, ज्यामागील कारण अनेकांना माहिती नाही. पण पूर्वीपासून चालत आली म्हणून ती परंपरा किंवा प्रथा आजही पाळली जाते. पण एखाद्या प्रथेमागील कारण समजल्यावर ते निभवण्यात एक वेगळाच आनंद आणि विश्वास असतो. लग्नानंतरची अशीच प्रथा आहे, नवीन जोडपं हे देवदर्शनाला जात असतं. सत्यनारायणाची पूजा झाल्यावर आपल्या शहरातील आणि कुलदैवतेच्या दर्शनासाठी जातात. अगदी महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्राचे नवीन जोडप दर्शन घेतात. 

महाराष्ट्रातील नवविवाहित जोडप्यांमधील ट्रेंडिंग देवदर्शनाचं ठिकाण म्हणजे जेजुरी. चित्रपटात दाखवल्याप्रमाने इथे नवरा हा आपल्या बायकोला उचलून दर्शनासाठी येतो, आजकाल याची क्रेझ तुम्हाला पाहिले मिळते. सोशल मीडियावर तर जेजुरी नवविवाहत जोडप्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिला मिळतात. पण तुम्हाला माहितीये का लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात? यामागे केवळ श्रद्धा नाही तर सुंदर परंपरा सुद्धा दडलेली आहे. चला तर मग यामागील कारण जाणून घेऊयात. 

 लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात? 

जेजुरीचा खंडेराया हा अनेकांच्या घराचा कुलदैवत आहेत. त्यामुळे बहुतांश लोक त्याच्या दर्शनासाठी जातात. पण प्रमुख कारण म्हणजे खंडेराया हे शिवाचं रुप, तर म्हाळसा देवी ही पार्वतीचं रुप मानले जाते. त्यामुळे शंकर आणि पार्वतीसारखा आपला संसार सुखी व्हावा, असा त्यामागील उद्देश असतो.  

असं मानलं जातं की जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतल्यावर संसारातले वाद, अडचणी दूर होऊन संसाराची सुरुवात आनंदी होते. बऱ्याच कुटुंबांमध्ये पूर्वजांच्या परंपरेप्रमाणे गोंधळ विधी खास जेजुरीतच केला जातो. अलीकडे नवऱ्याने बायकोला उचलून गड चढण्याची पद्धत प्रेम व्यक्त करण्यासाठी सुरू झाली आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)