गौतम गंभीरच्या आतापर्यंत सर्वात गाजलेल्या भांडणांचे व्हिडीओ

रणजी सामन्यात दिल्लीकडून खेळणारा क्रिकेटर गौतम गंभीर आणि पश्चिम बंगालचा कर्णधार मनोज तिवारी यांच्यात, क्रिकेटच्या मैदानात जोरदार वाजलं. हे भांडण शिव्यांपासून एकमेकांना भिडण्यापर्यंत गेलं.

Updated: Oct 27, 2015, 09:44 PM IST
गौतम गंभीरच्या आतापर्यंत सर्वात गाजलेल्या भांडणांचे व्हिडीओ title=

मुंबई : रणजी सामन्यात दिल्लीकडून खेळणारा क्रिकेटर गौतम गंभीर आणि पश्चिम बंगालचा कर्णधार मनोज तिवारी यांच्यात, क्रिकेटच्या मैदानात जोरदार वाजलं. हे भांडण शिव्यांपासून एकमेकांना भिडण्यापर्यंत गेलं.

बातमीच्या सर्वात खाली पाहा, गौतम गंभीरचे सर्वात गाजलेल्या भांडणांचे व्हिडीओ

गौतम गंभीर यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला. मनोज तिवारीने तर नंतर सांगितलं की, गौतम गंभीरने सौरव गांगुली आणि बंगालींविषयी शेरेबाजी केली, ही आपण सहन करू शकत नव्हतो, आपण गौतम गंभीरचा सन्मान करतो, पण गौतम गंभीरनेही आपल्या मर्यादा सांभाळायला हव्यात.

क्रिकेटर गौतम गंभीरचं क्रिकेटच्या मैदानात अनेक वेळा वाजलंय, गौतम गंभीरचं सर्वात चर्चेत आलेलं भांडणं होतं,  शाहीद आफ्रिदीशी झालेलं भांडण, कानपूरमध्ये एकदिवसीय सामन्यात शाहीद आफ्रिदी आणि गौतम गंभीरचं जोरदार वाजलं होतं, शिव्या कमेंटेटरच्या कानापर्यंत येत होत्या एवढं हे भांडण झालं होतं.

व्हिडीओ | खाली पाहा गौतम गंभीरची चर्चेतली भांडणं

गौतम गंभीर आणि आफ्रिदीचं भांडण

गौतम गंभीर आणि कामरान अकमलचं भांडण

गौतम गंभीर आणि विराट कोहलीचं भांडण

गौतम गंभीर आणि अंड्रे नीलचं भांडण

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.