भारताने U-19 वर्ल्डकप गमावलं, पण सरफराजने कमावलं

आज अंडर-१९ वर्ल्डकप फायनल भारताचा पराभव झाला. अर्ध्या पेक्षा जास्त टीम स्वस्तात तंबूत गेली. पण एक खेळाडूने आपल्या नावे एक रेकॉर्ड केला.

Updated: Feb 14, 2016, 04:28 PM IST
भारताने U-19 वर्ल्डकप गमावलं, पण सरफराजने कमावलं title=

मुंबई : आज अंडर-१९ वर्ल्डकप फायनल भारताचा पराभव झाला. अर्ध्या पेक्षा जास्त टीम स्वस्तात तंबूत गेली. पण एक खेळाडूने आपल्या नावे एक रेकॉर्ड केला.

सरफराज़ खानने अर्धशतक ठोकत लागोपाठ अंडर19 क्रिकेट विश्वकपमध्ये एक रेकॉर्ड तयार केला आहे. विराट कोहली, शिखर धवन, सेहवाग आणि जगातील इतर कोणत्याही खेळाडूला जे जमलं नाही ते सरफराजने करुन दाखवलं.

अंडर १९ विश्वकपमध्ये सगळ्यात जास्त अर्ध शतक ठोकण्याचा रेकॉर्ड सरफराजच्या नावावर झाला आहे. वेस्टइंडिजच्या क्रेग सोबत त्याने मागच्या मॅचमध्ये बरोबरी केली होती पण आज ५१ रनची इंनिग खेळत त्याने हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे.

विश्वकपमध्ये ३५५ रन करत तो सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.