Maharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल

लोकसभेत मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मतं दिली होती. यावेळी मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र,यावेळीही मुंबईत मुस्लिम मतदारांनी ठाकरेना साथ दिल्याचं पाहायला मिळतंय.   

शिवराज यादव | Updated: Nov 24, 2024, 08:41 PM IST
Maharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल title=

लोकसभेत मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मतं दिली होती. यावेळी मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र,यावेळीही मुंबईत मुस्लिम मतदारांनी ठाकरेना साथ दिल्याचं पाहायला मिळतंय. 

मुंबईत लोकसभा निवडणुकीप्रमाणंच विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूनं उभे राहिल्याचं दिसून येतंय. उद्धव ठाकरेंनी मुंबईत 22 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 10 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झालेत. या 10 पैकी भायखळा, माहीम, वांद्रे पूर्व आणि वर्सोवा या  मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम मतांमुळे ठाकरेंचे उमेदवार तरले आहेत.

मनसेनं अमित ठाकरेंना उमेदवारी दिल्यानं माहीम मतदारसंघाची चर्चा संपूर्ण राज्यभरात होती. माहीममध्ये उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी 1016 मतांनी विजय मिळवत भगवा फडकवलाय. तर सदा सरवणकर हे दुस-या स्थानी होते तर अमित ठाकरे हे तिस-या स्थानी होते. 

महेश सावंत यांना 50 हजार 213 मतं मिळाली तर शिवसेनेच्या सदा सरवणकर यांना 48,897 मतं मिळाली तर अमित ठाकरे यांना 33 हजार 62 हजार मतं मिळाली. 

सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यान हिंदू मतविभाजनाचा फटका अमित ठाकरे यांना बसलाय. तसेच सावंत यांना मुस्लिम मत मिळाल्यानं त्याचा विजय सुकर झालाय

माहिमप्रमाणंच मुस्लिम बहुल वर्सोव्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हारून खान 1600 मतांनी विजयी झालेत. हारून खान यांना 65 हजार 396 मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या भारती लव्हेकर यांना 63 हजार 796 मतं मिळाली आहेत. तर अपक्ष राजू पेंडणेकर यांना 58  हजार 644 मतं मिळालीत. या मतदारासंघातील मुस्लिम मतदारांनी ठाकरेंची साथ दिलेली दिसून येतेय.

मातोश्रीच्या अंगणात म्हणजेच वांद्रे पूर्व मतदारसंघात वरूण सरदेसाई यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. वरूण सरदेसाई यांचा 11 हजार 365 मतांनी विजय मिळवलाय. वरूण सरदेसाई यांना 57,708 मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या झिशान सिद्दीकी यांना 46 हजार 343 मतं मिळाली आहेत. तर मनसेच्या तृप्ती सावंत यांना 16 हजार 74 मतं मिळाली आहेत. वांद्रे पूर्वमध्येही मुस्लिम मतांमुळे वरूण सरदेसाईंचा विजय सुकर झालाय

भायखळ्यात 41.5 टक्के मुस्लिम मतदार आहेत. लोकसभेत हीच मतं निर्णायक ठरली होती. हीच मते विधानसभेतही उद्धव ठाकरेंचे उमदेवार मनोज जामसुतकर यांना पडलीत. मनोज जामसुतकर यांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा 31 हजार 361 मतांनी पराभव केलाय
तर एमआयएमचे उमेदवार यांना फक्त 5 हजार 531 मतं मिळालीत. लोकसभेप्रमाणंच विधानसभेतही मुस्लिमांची एकगठ्ठा मतं ठाकरेंना मिळालीत