शिखर धवनने अचानक केली निवृत्तीची घोषणा...पण

सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विस्फोटक बँटींग करणाऱ्या टीम इंडियांच्या गब्बरने रिटायरमेंटची घोषणा केली आहे. शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टीक क्रिकेटच्या गोलंदाजीतून रिटायरमेंट घोषित केली आहे. वेगळ्या अंदाजमध्ये त्यांने ही घोषणा केली. यापुढे तो  आता बॉलिंग करतांना दिसणार नाही. 

Updated: Feb 14, 2016, 02:50 PM IST
शिखर धवनने अचानक केली निवृत्तीची घोषणा...पण title=

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विस्फोटक बँटींग करणाऱ्या टीम इंडियांच्या गब्बरने रिटायरमेंटची घोषणा केली आहे. शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टीक क्रिकेटच्या गोलंदाजीतून रिटायरमेंट घोषित केली आहे. वेगळ्या अंदाजमध्ये त्यांने ही घोषणा केली. यापुढे तो  आता बॉलिंग करतांना दिसणार नाही. 

दक्षिण आफ्रिकेविरोधात बॉलिंग करतांना त्याला आयसीसीकडून नोटीस मिळाली होती. त्याच्या बॉलिंग अॅक्शनवर आयसीसीने प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे त्याने आज त्याच्या चाहत्यांना सांगितलं की तो आता गोलंदाजी करणार नाही. 

सुरुवातीला तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की धवन एवढ्या लवकर रिटायर्मेंट का घोषित करत आहे पण नंतर त्याने तो फक्त गोलंदाजीमधून निवृत्त होतं असल्याचं म्हटलं.