कोल्हापूरकरांचा लतादीदींविरोधात मोर्चा

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकल्याबद्दल कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा निषेध व्यक्त केला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर दोघांनाही कोल्हापूर पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 28, 2012, 12:34 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकल्याबद्दल कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा निषेध व्यक्त केला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर दोघांनाही कोल्हापूर पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे.
मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचा असलेला जयप्रभा स्टुडिओ 11 कोटी रुपयांना विकला. या व्यवहारात सुरेश वाडकर यांनी दलाली केल्याचा आरोप महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी केलाय. कोल्हापूरसाठी मानबिंदू असलेल्या या स्टुडिओची विक्री झाल्याने कोल्हापूरकर नाराज झाले आहेत.
सोमवारी शहरातून काढण्यात आलेला मोर्चा स्टुडिओवर धडकला. यानंतर सर्वांनी स्टुडिओचे व्यवस्थापक सुभाष पाटील यांची भेट घेऊन त्यांना स्टुडिओ विकू नये यासंदर्भात निवेद न केलं. लता मंगेशकर यांच्याविरोधात जनहित याचिकाही दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जयप्रभा स्टुडिओ विकल्याच्या निषेधार्थ लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं.