सोन्याचा नवा उच्चांक

सोन्याने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून, सोन्याचा भाव आता प्रतीतोळा ३१,०७७ रुपये इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी अचानक वाढल्याममुळे सोन्याची किंमत वाढली आहे. त्याचाच परिणाम देशातंर्गत सोन्याच्या बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या दराने उच्चांक दिसला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 27, 2012, 06:09 PM IST

www.24taas.com,जळगाव
सोन्याने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून, सोन्याचा भाव आता प्रतीतोळा ३१,०७७ रुपये इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी अचानक वाढल्याममुळे सोन्याची किंमत वाढली आहे. त्याचाच परिणाम देशातंर्गत सोन्याच्या बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या दराने उच्चांक दिसला.
२०१२ या वर्षाने सोन्याच्या भावात फक्त वाढ झालेलीच पाहिली आहे. जून महिन्यात सोन्याने ३०,७५० रुपये ही उच्चांकी पातळी गाठली होती. पण नंतर काही कारणामूळे सोन्याचे भाव २९ हजारांपर्यंत घसरले होते. परंतु गेल्या दोन महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावाला तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे.
जगभरातील शेअर बाजार यामुळे चांगलेच तेजीत आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था नवे वळण घेईल अशी तज्ज्ञांना आशा आहे. त्यातही तज्ज्ञांच्या मते हाच ट्रेंड अजून काही दिवस दिसून येईल, असा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाचे झालेले अवमूल्यन हे प्रमुख कारण आहे. डॉलरचे कायम वाढणारे दर आणि त्याच्या तुलनेत रुपयाची होणारी घट सोन्याच्या भावावर प्रत्यक्षपणे परिणाम करत असल्याचेही म्हटले आहे.
गेल्या वर्षभरापासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे. त्यारमुळे साहजिकच भारतात सोने महागले आहे.