अरे बापरे, टोल होणार चौपट..

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावचा टोल नाक्याचे दर आता चौपट होणार आहेत. सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलंय..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 11, 2014, 08:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावचा टोल नाक्याचे दर आता चौपट होणार आहेत. सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलंय..
नाशिकपासून केवळ चाळीस किलोमीटर अंतरात चांदवडसह पिंपळगाव या दोन टोलसाठी साडेपाचशे रुपये लागणार असल्याने राजकीय आंदोलनांचा भडका उडण्याची शक्यता आहे .
नाशिक जिल्ह्यातल्या चांदवमध्ये विराजमान असणा-या कुलस्वामिनी रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी राज्य भरातले बहुसंख्य भाविक नाशिकहून चांदवडला जातात. मात्र शहरातल्या भाविकांना आता साडेपाचशे रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
कारण नाशिकपासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर असलेला पिंपळगावचा टोलची आकारणी १४० रुपयांप्रमाणे होणार आहे.जवळच असलेला चांदवडचा टोल ११५ असल्याने नाशिक शहरातील भाविकांना पन्नास किलोमिटरसाठी साडे पाचशे रुपयांची आर्थिक झळ बसणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.