पैठणीच्या शिरपेचात मानाचा तुरा

येवल्याच्या पैठणीवर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. विणकर शांतीलाल भांडगे यांना पैठणीतील संशोधनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे भांडगे परिवाराला आत्तापर्यंत पैठणीच्या संशोधनासाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 11, 2012, 07:04 PM IST

www.24taas.com, नाशिक
येवल्याच्या पैठणीवर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. विणकर शांतीलाल भांडगे यांना पैठणीतील संशोधनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे भांडगे परिवाराला आत्तापर्यंत पैठणीच्या संशोधनासाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.
येवल्यातले पैठणी विणकर शांतीलाल भांडगे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. भांडगे यांनी पैठणीसाठी केलेल्या कार्याची दखल सरकार दरबारी नेहमीच घेण्यात आली. दिल्लीतल्या विज्ञान भवनात त्यांचा सन्मान करण्यात आला. पैठणीतल्या संशोधनाबरोबर तिचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रचार, प्रसारासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. भांडगे परिवारीतल्या सदस्यांना पैठणीतल्या विविध संशोधनासाठी आत्तापर्यंत 5 राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

शांतीलाल यांनी लहान वयातचं पैठणी व्यवसायात पदार्पण केलं. या व्यवसायात अनेक चढउतार येऊनही त्यांनी आपलं संशोधन सतत सुरुच ठेवलं. अस्सल पैठणीसाठी संपूर्ण जगभरात येवल्याचं नाव घेतलं जातं. पैठणीचं शहर म्हणून ओळखल्या जाणा-या येवल्यात सुमारे ५ हजार हातमाग आणि ७ हजार विणकर आहेत. भांडगे परिवाराला मिळालेल्या पुरस्कारानं येवलाच्याच नव्हे तर पैठणीच्या पेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.