पक्षातल्या तरूणांना डावलू नका, नाहीतर- अजितदादा

पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं.

Updated: Nov 10, 2012, 09:18 PM IST

www.24taas.com, जळगाव
पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं. यात बोलताना अजित पवारांनी आपल्याच पक्षातल्या ज्येष्ठांना खडे बोल सुनावले... त्यामुळे अजित पवार यांच्या मनात नक्की चाललयं तरी काय? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
`पक्षातल्या तरुणांकडे दु्र्लक्ष करू नका`! `वडिलांनी मुलांकडे दुर्लक्ष केलं तर बरं नाही`! असं म्हणत अजित पवार यांनी पक्षातीलच नेत्यांवर हल्लाबोल केला. अजित पवारांचा रोख नेमका कोणाकडे होता? याबाबत चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.
तरुण आपल्या पुढे जातील ही भीती अनाठायी असल्यानेच तरूणांना पक्षातून डावलण्यात येत आहे. आणि त्यामुळेच तरूणांना पक्षात असुरक्षितता निर्माण होते असे स्पष्टपणे अजित पवारांनी वरीष्ठ नेत्यांना सुनावले आहे. `पक्षातल्या तरुणांना डावलू नका`! `तरूण अन्यत्र जाऊन स्वतःला सिद्ध करतात` असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.