राज्यात राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस महत्त्वाचा

राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकीकडे शिवसेना-भाजपामधील ताणलेल्या संबंधांनंतर उद्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी उद्या शिवसेना आमदारांची बैठक बोलवली आहे. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार आणि शिवसेनेच्या बैठकीत सरकारमध्ये राहण्याबाबत शिवसेना काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे. 

Updated: Nov 2, 2015, 04:37 PM IST
राज्यात राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस महत्त्वाचा title=

मुंबई: राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकीकडे शिवसेना-भाजपामधील ताणलेल्या संबंधांनंतर उद्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी उद्या शिवसेना आमदारांची बैठक बोलवली आहे. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार आणि शिवसेनेच्या बैठकीत सरकारमध्ये राहण्याबाबत शिवसेना काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे. 

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरापलिका निवडणुकीत शिवसेना-भापजामधील संघर्ष अगदी टोकाला पोहचला. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका केली. शिवसेना-भाजपामधील या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रिमडळाची बैठक होत आहे. या बैठकीत डाळीच्या दरावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत दिले होते.

आणखी वाचा - शिवसेना-मनसे नेत्यांची मुंबईत छुपी बैठक

या सगळ्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारीच शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची बैठक बोलवली आहे. ही बैठक गरमागरम होणार अशी शक्यता आहे. सत्तेमध्ये आणि सत्तेच्या बाहेरही भाजपाकडून शिवसेनेला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड रोष आहे. तर काही मंत्रीही भाजपावर तीव्र नाराज आहेत. याच नाराजीतून मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत आपला मंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला होता. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी एकट्या एकनाथ शिदेंचा नव्हे तर वेळ आल्यास सर्वांचे राजीनामे घेऊन सरकारला रस्त्यावर आणण्याची भाषा केली होती.

भाजपाविरोधात शिवसेना आक्रमक झाली असली तरी पक्षात दोन मतप्रवाह आहेत. काही मंत्री आणि शिवसेनेच्या वरच्या गोटातील नेत्यांच्या मते शिवसेना १५ वर्षांनी सत्तेत सहभागी झाली असल्यानं सत्तेत राहून सत्तेचे फायदे घ्यावेत, असा एक मतप्रवाह आहे. तर सत्तेत सहभागी असूनही आमदारांची कामं होत नसल्याची तक्रार शिवसेना आमदार वारंवार करत आहेत. त्यामुळं मंगळवारची मंत्रिमंडळ बैठक आणि शिवसेना आमदारांची बैठक राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे.

आणखी वाचा - LIVE: कल्याण डोंबिवलीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष, पण
 
राज्यातील सरकारची नुकतीच वर्षपूर्ती झाली. मात्र या वर्षभरातच शिवसेना आणि भाजपाचे संबंध कामालीचे ताणले गेले आहेत. महानगरापालिका निवडणुकीत एकमेकांची उणीदुणी काढून हे दोन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र राहणार असं चित्र आहे. तरीही शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळं शिवसेना आमदारांच्या बैठकीला विशेष महत्त्व आलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.