बेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना, मनसेकडून स्वागत

बेनामी मालमत्तेच्या माध्यमातून काळा पैसा दडवून ठेवलेल्यांवर बेनामी मालमत्ता अधिनियम 2016 च्या नव्या कठोर नियमानुसार कारवाई होणार आहे. हा नवा अधिनियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत मन की बातमधून सुतोवाच केलं.

Updated: Dec 26, 2016, 06:03 PM IST
बेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना, मनसेकडून स्वागत  title=

मुंबई : बेनामी मालमत्तेच्या माध्यमातून काळा पैसा दडवून ठेवलेल्यांवर बेनामी मालमत्ता अधिनियम 2016 च्या नव्या कठोर नियमानुसार कारवाई होणार आहे. हा नवा अधिनियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत मन की बातमधून सुतोवाच केलं.

बेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना आणि मनसेनं स्वागत केलं आहे. पण नोटाबंदीनंतर सामन्य जनतेला जे हाल सोसावे लागले तशी परिस्थिती पुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना दोन्ही पक्षांनी केंद्र सरकारला केली आहे.