मे महिन्यात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांनी शुक्रवारी थंडाव्याचा अनुभव घेतला. आज संध्याकाळी नवी मुंबईच्या नेरुळ, पनवेल, खारघर या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच बदलापुरमध्ये पाऊस झाला. 

Updated: May 12, 2017, 08:47 PM IST
मे महिन्यात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी title=

मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांनी शुक्रवारी थंडाव्याचा अनुभव घेतला. आज संध्याकाळी नवी मुंबईच्या नेरुळ, पनवेल, खारघर या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच बदलापुरमध्ये पाऊस झाला. 

भारतीय हवामान खात्याने याआधीच शुक्रवारी अवकाळी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवला होता. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होईल अशीही शक्यता व्यक्त केलीये. 

तसेच यंदाच्या वर्षी साधारणपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय.