लालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस!

लालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस!

Updated: Jan 14, 2015, 01:15 PM IST
लालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस! title=

मुंबई : ही बातमी आहे मुंबई पोलिसांच्या चोख कामगिरीची...  

गेल्या आठवड्यात लालबागमध्ये दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल  साईटसवरून आणि व्हॉटसअपवरून वेगानं पसरत होते. अनेकांनी  राज्याबाहेर घडलेल्या दंगलींचे फोटो आणि व्हिडिओ लालबागचे  असल्याचं सांगत अफवा पसरवण्याचं काम केलं. यामध्ये, भावना दुखावल्या गेल्याचं बनाव करत धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रयत्नही काही समाजविघातकांनी केले. याचे दुष्परिणाम वेळीच लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकलं.

अफवांचं हे पेव थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल ५० लाख एसएमएस मुंबईभर पाठवले.... तसंच कायदा सुव्यस्थेला धोका निर्माण करणाऱ्या एक हजारपेक्षा जास्त पोस्ट्स आणि वेबसाईटही तातडीनं बंद केल्या. 

विशेष म्हणजे, पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर चुकीची माहिती पसरवणं या अंतर्गत एक गुन्हाही दाखल केलाय. मुळात जेव्हा लालबागची घटना घडली, तेव्हा पोलिसांनी ताबडतोब परिस्थिती व्यवस्थित हाताळली....पण त्याहीपुढे जाऊन या घटनेचे नंतर पडसाद उमटू नयेत, म्हणून खबरदारीही घेतली.... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.