मित्रपक्ष शिवसेनेच्या 'सामना'त मोदी सरकारच्या वर्षपूर्तीला जागा नाही

पंतप्रधानांनी सर्वच वर्तमानपत्रातून जनतेशी संवाद साधला असताना मित्रपक्ष शिवसेनेचं मुखपत्र 'सामना' मात्र याला अपवाद ठरलंय... मराठीत सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात आहे. 

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 26, 2015, 12:37 PM IST
मित्रपक्ष शिवसेनेच्या 'सामना'त मोदी सरकारच्या वर्षपूर्तीला जागा नाही title=

मुंबई: पंतप्रधानांनी सर्वच वर्तमानपत्रातून जनतेशी संवाद साधला असताना मित्रपक्ष शिवसेनेचं मुखपत्र 'सामना' मात्र याला अपवाद ठरलंय... मराठीत सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात आहे. 

अगदी नारायण राणेंच्या 'प्रहार'मध्येही पहिल्या पानावर जाहिरात छापण्यात आलीये... गम्मत म्हणजे या जाहिरातीच्या वरतीच सरकारच्या १ वर्षाच्या कारभाराचे वाभाडे काढणारी बातमीही छापलीये... सामनामध्ये मात्र जाहिरातही नाही आणि सरकारच्या वर्षपूर्तीची बातमीलाही फारशी जागा आणि महत्त्व देण्यात आलेलं नाही... 

एरवी लहानसहान गोष्टींवर अग्रलेख लिहिणाऱ्या सामनानं तिथंही याची दखल घेतलेली नाही. केवळ आतल्या पानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली एक जाहिरात वगळता मोदी सरकारची वर्षपूर्ती सामनामध्ये दिसत नाहीये.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.