बँक कर्मचार्‍यांना ५,५०० रुपयांची पगारात वाढ

 देशातील साडेसात लाखांहून अधिक कर्मचार्‍यांच्या पगारात थकबाकीसह २२०० पासून ५५०० रुपयांपर्यंत पगारवाढ करण्यात आली आहे. नविन करारामुळे लिपिकांना ११ हजार ७६५ वरून थेट ३१ हजार ५४० पर्यंत पगारवाढ मिळणार आहे तर शिपायांचा पगार ८५०० वरून १८ हजार ५४५ इतका वाढला आहे. 

Updated: May 26, 2015, 09:15 AM IST
बँक कर्मचार्‍यांना ५,५०० रुपयांची  पगारात वाढ title=

मुंबई : देशातील साडेसात लाखांहून अधिक कर्मचार्‍यांच्या पगारात थकबाकीसह २२०० पासून ५५०० रुपयांपर्यंत पगारवाढ करण्यात आली आहे. नविन करारामुळे लिपिकांना ११ हजार ७६५ वरून थेट ३१ हजार ५४० पर्यंत पगारवाढ मिळणार आहे तर शिपायांचा पगार ८५०० वरून १८ हजार ५४५ इतका वाढला आहे. 

यापुढे बँक कर्मचार्‍यांना दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असणार आहे तर पहिल्या आणि तिसर्‍या शनिवारी त्याबाबतचे अधिक काम करून घेतले जाणार आहे. नव्या कराराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच पुरुष कर्मचार्‍यांना १५ दिवसांची पालकत्वाची रजा मिळणार आहे. तसचे घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, शैक्षणिक भत्ता, हॉस्पिटलायझेशन भत्ता, व्यक्तिगत भत्ता, मुक्काम भत्ता अशी वाढ समाविष्ट आहे. यामुळे लिपिकांना ११ हजार ७६५ वरून थेट ३१ हजार ५४० पर्यंत पगारवाढ मिळणार आहे तर शिपायांचा पगार ८५०० वरून १८ हजार ५४५ इतका वाढला आहे.

शिवसेनाप्रणीत बँक कर्मचारी सेना महासंघाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रासह देशातील बँक कर्मचार्‍यांना या पगारवाढीचा लाभ मिळणार आहे. महासंघाच्या सततच्या प्रयत्नांमुळे हा द्विपक्षीय करार करण्यात आला. २०१२ ते २०१७ पर्यंत या करारानुसार अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळापासून संघटना सतत याबाबत प्रयत्नशील होती. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर दोन वेळा बैठका झाल्या. त्यांनी उत्तम सहकार्य केले. त्यामुळेच हा करार प्रत्यक्षात येऊ शकला असे देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी सरचिटणीस राजन तुळसकर , तसेच प्रवक्त्या मनीषा कायंदे उपस्थित होत्या.
 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.