ठाणे रेल्वे स्टेशन झालंय मृत्यूचा सापळा

मुंबई आणि परिसराची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकं मृत्युचा सापळा केव्हाच बनली आहे. कारण गेल्या वर्षभरातील आकडेवारी बघितली तर पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ३ हजार ३५२ रेल्वे प्रवाशांचा मृत्यु विविध कारणांनी हा झाला आहे. 

Updated: Jan 28, 2015, 12:50 PM IST
ठाणे रेल्वे स्टेशन झालंय मृत्यूचा सापळा title=

ठाणे : मुंबई आणि परिसराची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकं मृत्युचा सापळा केव्हाच बनली आहे. कारण गेल्या वर्षभरातील आकडेवारी बघितली तर पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ३ हजार ३५२ रेल्वे प्रवाशांचा मृत्यु विविध कारणांनी हा झाला आहे. 

तर ३ हजार २६५ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर सर्वात जास्त मृत्यु झाले आहेत. 

१३० रेल्वे प्रवाशांचा मृत्यु हा ठाणे रेल्वे स्थानकात झाला आहे. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक प्रवाशांचा हा रेल्वेरुळ ओलांडतांना मृत्यु झाला आहे. तर ठाणे पाठोपाठ कल्याण स्थानकात १२३, कुर्ला स्थानकांत ११५ आणि पश्चिम रेल्वेच्या ८० जणांचा मृत्यु झाला आहे. 

ठाणे रेल्वे स्टेशन मृत्यूचा सापळा ?
२०१४ मध्ये ठाणे स्टेशनवर सर्वाधिक मृत्यू
५० टक्के मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना
ठाणे स्टेशनवरील मृत्यूचा आकडा १३० 

thane, station, accidents, ठाणे, स्टेशन, लोकल, अपघात

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.