एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला, काही प्रवासी जखमी

नागपूरहून मुंबईला आलेल्या एअर इंडियाच्या AI630 विमानाचा टायर फुटल्याची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. 

Updated: Mar 16, 2016, 08:32 AM IST
एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला, काही प्रवासी जखमी title=

मुंबई : नागपूरहून मुंबईला आलेल्या एअर इंडियाच्या AI630 विमानाचा टायर फुटल्याची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. 

AI630 हे विमान नागपूरहून मुंबईला आले होते. एकूण १६१ प्रवासी या विमानात प्रवास करत होते. या दुर्घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. 

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घटली. यावेळी एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, टायर फुटल्याने सुरुवातीला आम्ही खूप घाबरलो. मात्र त्यानंतर सावरलो. विमानातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या.