रत्नागिरी : दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांनी केलाय... आणि आता तर योगेश कदमांनी अधिकारी कसे पैसे लाटतात, त्याची एक ऑडिओ क्लीपच पुढे आणलीय.
या व्हिडिओ क्लिपमध्ये ज्या मजूर संस्थेनं हे काम घेतलंय त्या मजूर संस्थेचा अध्यक्ष दिनकर मोहिते आणि या कामांचा सब ठेका घेणारा चंदू पवार यांच्यात झालेल्या संभाषण दिसतंय. यामध्ये मोहिेते हा चंदू पवारांशी बोलताना याबाबत आमच्यावर अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचं बोलताना दिसतोय.
दरम्यान, आम्ही या सगळ्या ऑ़़डिओ क्लीपबाबत स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेत साईट विझीटवर गेल्याचे सांगितलं. तसंच फोनवरुन आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनवरुनही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.