नागपूर जेल प्रकरण: फरार आरोपींचा म्होरक्या सत्येंद्र गुप्ताला अटक

नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या ५ कैद्यांपैकी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. सत्येंद्र गुप्ता असं या आरोपीचं नाव आहे. त्याला जबलपूर एक्स्प्रेसमधून अटक करण्यात आलीय. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केलीय.

Updated: Jul 12, 2015, 02:05 PM IST
नागपूर जेल प्रकरण: फरार आरोपींचा म्होरक्या सत्येंद्र गुप्ताला अटक  title=

नागपूर: नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या ५ कैद्यांपैकी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. सत्येंद्र गुप्ता असं या आरोपीचं नाव आहे. त्याला जबलपूर एक्स्प्रेसमधून अटक करण्यात आलीय. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केलीय.

३१ मार्च रोजी नागपूरच्या सेंट्रल जेलमधून ५ कैदी फरार झाले होते. या फरार झालेल्या आरोपींचा सत्येंद्र गुप्ता हा म्होरक्या होता. त्याच्यावर २३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 

पाच आरोपींनी मध्यवर्ती कारागृहाची संरक्षण भिंत पार करून पलायन केलं होतं. या प्रकरणी आतापर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होतं. आता या गुन्ह्याचा सूत्रधार सतेंद्र गुप्ता याला पोलिसांनी अटक केल्यानं पाचव्या आरोपींचा शोध लागण्यास मदत होणार आहे. 

सतेंद्र गुप्ता हा अत्यंत धोकादायक गुंड असून त्याच्यावर महाराष्ट्रात १६, मध्यप्रदेशात ७ त्यापैकी २ मोक्याचे, दरोड्याचे ५, खुनाचे २, खुनाचा प्रयत्न ४, जबरी चोरीचे २ असे २३ गुन्हे दाखल आहेत, सतेंद्र गुप्ता याचा शोध घेण्यासाठी पोलीस दोन महिन्यांपासून त्याच्या मागावर होती. मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात त्याचा शोध सुरु असतना तो मध्य प्रदेशच्या जबलपूर मध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.