नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबासोबत बोटिंग एन्जॉय करतानाचा फोटो टाकणारी व्यक्ती सापडली आहे.
नागपूर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष अजय हटेवार यांनी आपणच ही पोस्ट टाकल्याचं मान्य केलंय. राज्यात शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री अमेरिकेत कुटुंबियांसोबत मजा करत असल्याचं या फोटो पोस्टमध्ये म्हटलं होतं, तर हा फोटो अमेरिकेतला नसून गोव्यातला आणि तोदेखील ४-५ वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा भाजपानं केला आहे.
मुख्यमंत्र्यांची बदनामी झाली म्हणून याविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल झाली आहे. आता हटेवार यांनीच ही पोस्ट टाकल्याचं मान्य केल्यामुळे पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, हटेवार यांनी आपण ही पोस्ट टाकल्याचं मान्य केलं असलं, तरी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा आपला हेतू नसल्याचंही ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.