राज्याचा १२वीचा निकाल ९१.२६ टक्के, कोकण अव्वल!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी  मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला आहे. 

Updated: May 27, 2015, 01:30 PM IST
राज्याचा १२वीचा निकाल ९१.२६ टक्के, कोकण अव्वल! title=

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी  मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. ९५.६८ टक्के गुण मिळवून कोकण बोर्ड राज्यात चौथ्यांदा पहिल्या नंबरवर आहे. तर राज्याचा निकाल ९१.२६ टक्के लागलाय.

LIVE UPDATE : १६१ विषयांपैकी १४ विषयांचा निकाल १०० टक्के
LIVE UPDATE : राज्यात एकूण ९१.३५ टक्के अपंग विद्यार्थी उत्तीर्ण
LIVE UPDATE : रात्र महाविद्यालयातील ६५.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
LIVE UPDATE : ११ शाळांचा शून्य टक्के निकाल

LIVE UPDATE : नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल- ८८.१३ टक्के 

LIVE UPDATE : एमसीव्हीसी शाखेचा ८९.२० टक्के निकाल
LIVE UPDATE : कला शाखेचा ८६.३१ टक्के निकाल 
LIVE UPDATE : वाणिज्य शाखेचा ९१.६० टक्के निकाल 
LIVE UPDATE : विज्ञान शाखेचा ९५.७२ टक्के निकाल
LIVE UPDATE : राज्यात एकूण ८८.८० टक्के मुलं उत्तीर्ण
LIVE UPDATE : बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, ९४.२९ टक्के मुली उत्तीर्ण  

बोर्डनुसार निकाल - 

अमरावती ९२.५० टक्के

कोल्हापूर ९२.१३ टक्के,

नागपूर ९२.११ टक्के,

लातूर ९१.९३ टक्के,

औरंगाबाद ९१.७७,

पुणे ९१.९६ टक्के,

मुंबई ९०.११ टक्के,

नाशिक ८८.१३ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी  मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला आहे. तर गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींचे वाटप ४ जून रोजी दुपारी ३ वाजता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता संकेतस्थळावरून निकालाची प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे, त्यांना मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विहित नमुन्यात शुल्कासह १५ जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. 

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रतही उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी येत्या २७ मे ते १५ जून या कालावधीत अर्ज करता येईल, असं मंडळातर्फे कळविण्यात आलं आहे. 

 

इथं पाहता येणार निकाल - 

 -  www.maharesult.nic.in  
 -  www.maharashtraeducation.com  
 -  www.hscresult.mkcl.org  
 -  www.rediff.com/exams  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.