धुळे : रेशीम गाठी या केव्हा कश्या जुडून येतील हे कोणीही सांगू शकत नाही. याचा प्रत्यय नुकताच धुळे जिल्ह्यातील बळसाणे येथे अवघ्या साडे तीन फुटाच्या जोडप्याच्या लग्न समारंभात अनुभवायला मिळाला.
वर होता धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील तर वधू होती मध्य प्रदेश राज्यातील झामबुवा जिल्यातील. दोघांची उंची कमी… सामान्यांपेक्षा कमी उंची असल्यानं लग्नात अडथळे येत... दोघे योग्य जोडीदाराच्या शोधात… योग जुळून आले आणि ३०० किलोमीटरचे अंतर क्षणात मिटले आणि धीरज-पूजा लग्नाच्या रेशीम गाठीत बांधले गेले.
धीरज शेअर मार्केटचे बादशाह आहे तर पूजा झाम्बुआमध्ये एक टुमदार मॉल चालवत होती..एकमेकांची साथ लाभल्यामुळे धीरज आणि पूजा खूपच खूष आहेत. विशेष म्हणजे कुठलाही पूर्व संबध नसताना ते अनोख्या पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकले.
धीरजसारखीच पूजा तिच्या कुटुंबाची लाडाची लेक... पूजाच्या खंबीरपणामुळे कुटुंबावर ती कधी आपल्यावर ओझं झाली नसल्याचं तिचे वडील प्रवीण खुराना सांगतात. नेपोलियनला जग जिंकल्यावर झाला नसेल इतका आनंद आज पूजाच्या वडिलांना झाल्याचं ते सांगतात.
'रब'ने बनवलेली ही अनोखी जोडी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलीय. कमी उंचीला व्यंग न समजता छाजेड आणि खुराना कुटुंबीयांनी धीरज आणि पूजाला दिलेली साथ नक्कीच कौतुकास्पद आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.