मुंबई : एखादा साधारण: माणूस दिसणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणाऱ्या या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय.
'भिडे गुरुजींनी मला इथं आमंत्रित केलेलं नाही तर मी त्यांच्या हुकूमावरून इथे आलोय' असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी लोकसभेदरम्यान महाराष्ट्रातील एका रॅलीत केलं होतं. त्यांनंतर हे भिडे गुरुजी कोण आहेत? हे जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेही भिडे गुरुजींना आपले आदर्श मानतात.
कोण आहेत हे भिडे गुरुजी...
सातारा-सांगली-कोल्हापूर या महाराष्ट्रातल्या पश्चिम पट्ट्याला भिडे गुरुजी कोण आहेत हे सांगण्याची गरज लागणार नाही.
८५ वर्षांचे भिडे गुरुजींची आज भारतातल्या अनेक नेटिझन्सशीही ओळख झालीय. शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे यांना सगळे जण 'भिडे गुरुजी' म्हणूनच ओळखतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या जीवनावर विशेष परिणाम दिसून येतो.
संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते
हिंदुत्ववादी कार्यकर्ते असलेले संभाजी भिडे यांनी एम.एस.सी पूर्ण केलंय. त्यांनी पुणे विद्यापिठातून फिजिक्समध्ये गोल्ड मेडलही पटकावलंय. त्यांनी काही काळ प्रोफेसर म्हणूनही काम केलं. परंतु, ते आरएसएसमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या सगळ्या इच्छांचा त्याग करत संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
शिवप्रतिष्ठानची स्थापना
१९८० मध्ये त्यांनी आपला मार्ग थोडा वळवला आणि शिवप्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली. भिडे गुरुजींनी आजपर्यंत राजकीय पक्षांपासून लांब राहणच पसंत केलंय.
गुरुजी आपल्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. त्यांच्या नावावर आजही स्वत:च घर नाही... ना त्यांच्या पायात कधी चप्पल असते...
'जोधा-अकबर'च्या वादात उडी
भिडे गुरुजी अनेकदा वादातही आलेत. २००८ साली आलेल्या जोधा-अकबर या सिनेमाला विरोध करताना त्यांनी सिनेमाचे पोस्टर फाडले होते. इतकंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी या सिनेमाचं स्क्रिनिंगही बंद पाडलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.