योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : दहावीत इंग्रजी विषयात नापास झालेला तरूण आज डेन्मार्कच्या विद्यापीठात इंग्रजी विषयाचं शिक्षण देतोय. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू असलेल्या तरूणीशी तो लग्नही करणार आहे. मनमाडच्या एका गरीब घरातल्या राहुल एलिंजेनं योगाच्या कठोर तपश्चर्येतून हे यश मिळवलं आहे...
राहुल आणि त्याची भावी पत्नी सिसिलीया पीटरसन... येत्या वीस तारखेला भारतीय पद्धतीने लग्न करणार आहेत. योगाच्या आवडीने या दोघांना एकत्र आणलंय. राहुल सध्या आरूस या विद्यापीठात इंग्रजी विषयाचा प्राध्यापक आहे... तर सिसिलीया कोपनहेगन इथली आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. मनमाडमध्ये या दोघांना विवाह होणार आहे.
राहुल एरींगेची कहाणीही विशेष आहे. रेल्वेच्या शाळेत शिकणारा राहुल दहावीत इंग्रजी विषयात नापास झाला होता... मात्र अपयशाच्या व्यथेनं त्याचं जीवनच बदलून गेलं. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचा ध्यास घेऊन तो दहावी फेरपरीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर बीएड एमएड केलं. व्यक्तिमत्व हुशारीच्या जोरावर त्याने युहॉनची शिष्य़वृत्ती मिळावली. स्वीडनमध्ये संशोधन करत त्याने आपल्या कामाची पावती मिळवली. आता तो स्वतः इंग्रजी विषयाचा प्राध्यापक आहे.
राहुलच्या या कर्तृत्वाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे... अपयशानं खचून न जाता प्रयत्नपूर्वक ध्येयप्राप्ती कशी करावी याचं राहुल हे चालतं बोलतं उदाहरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.