मराठा मोर्चात नागरिकांची अलोट गर्दी

ठाण्यातील मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजांच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तीनहात नाक्यापासून सुरु झालेल्या मोर्चाची जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन सांगता झाली.

Updated: Oct 16, 2016, 03:25 PM IST
मराठा मोर्चात नागरिकांची अलोट गर्दी title=

ठाणे : ठाण्यातील मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजांच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तीनहात नाक्यापासून सुरु झालेल्या मोर्चाची जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन सांगता झाली.

नवी मुंबई, भिवंडी, कल्याण या भागातून मराठा समाजाचे नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात महिला आणि तरुणाईची लक्षवेधी उपस्थिती पाहायला मिळाली. 

मोर्चादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाच्या काळात महत्त्वाचे मार्गही बंद ठेवण्यात आले होते. मोर्चातील वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान मोर्चासाठी रेल्वेकडून विशेष 40 लोकल सोडण्यात आल्यात.