प्राणघातक हल्ल्यात माजी नगराध्यक्ष सचिन शेळकेंचा मृत्यू

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर  प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यात शेळके यांचा मृत्यू झालाय.

Updated: Oct 16, 2016, 12:51 PM IST
प्राणघातक हल्ल्यात माजी नगराध्यक्ष सचिन शेळकेंचा मृत्यू title=

लोणावळा : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आलीये. 

तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे नेते सचिन शेळके हे तळेगाव ते स्टेशन रस्त्यावरील खांडगे पेट्रोल पंपाजवळ आले असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीनी गोळीबार तसेच त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. हत्येनंतर अज्ञात हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. 

तळेगाव दाभाडे पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मात्र, शेळके यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ही हत्या राजकीय वादातून किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीतून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविलाय. पुढील तपास तळेगाव पोलिस करीत आहेत.