महावितरण जुन्या ५०० रुपयांच्या नोट स्वीकारणार

 राज्य शासनाकडून आलेल्या आदेशानंतर महावितरण वीज बिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2016 पर्यन्त घरगुती आणि वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणार आहे. ज्या घरगुती वीज ग्राहकांकडे जुन्या पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Updated: Nov 25, 2016, 10:20 PM IST
महावितरण जुन्या ५०० रुपयांच्या नोट स्वीकारणार title=

ठाणे :  राज्य शासनाकडून आलेल्या आदेशानंतर महावितरण वीज बिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2016 पर्यन्त घरगुती आणि वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणार आहे. ज्या घरगुती वीज ग्राहकांकडे जुन्या पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

ग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रक्कमेचे राहील तेवढ्या रक्कमेच्या जुन्या पाचशेच्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. मात्र वीज बिलापोटी आगाऊ स्वरुपात (ऍ़डव्हान्स पेमेंट) रक्कम स्वीकारण्यात येणार नाही. 

याशिवाय वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in आणि मोबाईल ऍ़पची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यातयेत आहे.