दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!

उत्सवाच्या काळात होणारं ध्वनीप्रदूषण हा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. त्याविरुद्ध आता ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवाच्या काळात ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय. त्याचं स्वागत होते आहे. 

Updated: Aug 8, 2014, 12:09 PM IST
दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान! title=

ठाणे: उत्सवाच्या काळात होणारं ध्वनीप्रदूषण हा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. त्याविरुद्ध आता ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवाच्या काळात ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय. त्याचं स्वागत होते आहे. 

पोलिसांच्या कारवाईविरोधात निषेध म्हणून उत्सवकाळात लाऊडस्पिकर न पुरवण्याचा निर्णय लाऊडस्पिकर संघटनांनी घेतलाय. निर्णयाचंही सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केलंय. दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या काळात होणारं ध्वनिप्रदुषण हा चिंतेच्या विषय असतो.

पोलिसांची कारवाई आणि ध्वनिवर्धक यंत्रणांचा निषेधाचा बहिष्कार यामुळं जर ध्वनिप्रदूषणातून सुटका झाल्यास सर्वसामान्यांना हवंच आहे. आता पोलिसांनी कारवाईवर ठाम राहावे अशी अपेक्षा व्यक्त होतेय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.