जळगाव : अमिताभ बच्चन महाराष्ट्राच्या फलोत्पादन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाले आहेत. ते आता महाराष्ट्राच्या फळांचे मार्केटिंग करणार आहेत. अमिताभ बच्चन हे राज्याच्या फळांची काळजी घेणार आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीला सुरूवातही केली आहे. याचे फोटो सोशल नेटवर्किंगवरही झळकले आहेत.
मात्र यावर जळगावच्या शेतकऱयांनी अमिताभ बच्चन यांना सवाल केले आहेत. कारण या फोटोंमध्ये जळगावची केळी दिसत नाहीय. अमिताभजी आमची जळगावची केळी गेली कुठे? असा सवाल जळगावच्या शेतकऱ्यांनी केलाय.
केळीला फळाचा दर्जा नसल्याने ही अडचण असल्याचे काहींनी सांगितलंय. जर केळीला फळाचा दर्जा नाही, तर नवीन फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हड, यावर केळीला विशेष दर्जा मिळवून देतील का?, असा सवाल उपस्थित होतोय. कारण केळीला फळांचा दर्जा मिळाला, तर जळगावच्या शेतकऱयांना पिवळ्या सोन्यासारखी केळीची शेती करण्यास मदत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.