नवी दिल्ली : राज्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी... राज्यातल्या बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारनं उठवलीय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिलीय. बैलाचा छळ होत असल्याच्या तक्रारींवरून गेल्या सरकारच्या काळात शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती.
या बंदीमुळे राज्याच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. भाजपनं विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारात बंदी उठवण्याचं आश्वासनही दिलं होतं. ते आश्वासन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पूर्ण केल्याचं दिसतंय.