उपराजधानीत दिवसाढवळ्या १४ वर्षीय मुलाचं अपहरण

नागपूरच्या मनीष नगर भागात एका १४ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तींनी दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान अपहरण केलयं.

Updated: Jan 8, 2016, 11:53 AM IST
उपराजधानीत दिवसाढवळ्या १४ वर्षीय मुलाचं अपहरण title=

नागपूर : नागपूरच्या मनीष नगर भागात एका १४ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तींनी दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान अपहरण केलयं.

पांढऱ्या रंगाच्या मारुती इको गाडीतून चैतन्य आष्टनकर याचं अपहरण करण्यात आलंय. नागपूरच्या माऊंटफोर्ट शाळेत शिकणारा चैतन्य दुपारी शाळा सुटल्यावर स्कूल बसने घराजवळ उतरला. चालत घरी जात असताना त्याचे अपहरण करण्यात आले.

 

त्याचे अपरहण कुणी आणि कुठल्या हेतूसाठी केले हे अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करताय आहेत.

या घटनेमुळे नागपूर मध्ये खळबळ उडालीये. या प्रकरणामुळे नागपूर पोलीसांसमोर अपहरणकर्त्यांना पकडण्याचं मोठे आव्हान निर्माण झाले आहे.