बिबट्याच्या हल्ल्यात अंगणात खेळणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका ४ वर्षाचा चिमुरड्याचा मृत्यू झालाय. निफाड तालुक्यातील भुसे या गावात ही घटना घडलीये. बिबट्यानं शुक्रवारी रात्री या चिमुरड्याला घरासमोरून उचलून नेलं होतं.

Updated: Apr 18, 2015, 05:32 PM IST
बिबट्याच्या हल्ल्यात अंगणात खेळणाऱ्या  चिमुरड्याचा मृत्यू  title=

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका ४ वर्षाचा चिमुरड्याचा मृत्यू झालाय. निफाड तालुक्यातील भुसे या गावात ही घटना घडलीये. बिबट्यानं शुक्रवारी रात्री या चिमुरड्याला घरासमोरून उचलून नेलं होतं.

गणेश मदन पोटे या ४ वर्षीय चिमुरडा अंगणात खेळत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्यानं हल्ला केला. त्यानंतर घरच्या मंडळीनं धावाधाव केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
 

कालच जुन्नरजवळच्या खामुंडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आता ही घटना ताजी असताना आणखी एक जीव गेला आहे.  त्यामुळं बिबट्याची दहशत कधी संपेल, त्यावर काय उपाय केला जातो, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.