मुंबई : वादग्रस्त 'एआयबी नॉकआऊट' (ऑल इंडिया बॅकचोद) या कार्यक्रमावर टीका झाल्यानंतर सगळ्याच सेलिब्रिटिंनी या विषयावर बोलणं टाळलं... पण, आपल्या भूमिका ठोकपणे मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमिर खाननं मात्र आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडलीय.
आपल्याला अशा प्रकारचे 'व्हायलन्ट जोक्स' अजिबात आवडत नसल्यानं आपणं या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मित्र कलाकारांना झापल्याचंही त्याननं म्हटलंय... शिवाय, शिव्या देऊन मला हसवण्याचं माझं आत्ता वय नाही... मी काही आता १४ वर्षांचा राहिलेलो नाही, असंही आमिरनं म्हटलंय. मला जर हसवायचं असेल तर कुणालाही दुखावल्याशिवाय निखळ जोक करा... त्याचा आनंद जास्त मिळेल.. असंही सांगायला तो विसरला नाहीय...
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.