सल्लूच्या 'हिट अँड रन' निकालाची तारीख उद्या होणार जाहीर

सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याच्या निकालाची तारीख उद्या जाहीर केली जाणार आहे. आज या खटल्यात सलमानच्या वकिलांनी बचावाचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद संपला असून, आता उद्या न्यायालय खटल्याच्या निकालाची तारीख जाहीर करणार आहे. 

Updated: Apr 20, 2015, 11:15 PM IST
सल्लूच्या 'हिट अँड रन' निकालाची तारीख उद्या होणार जाहीर title=

मुंबई: सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याच्या निकालाची तारीख उद्या जाहीर केली जाणार आहे. आज या खटल्यात सलमानच्या वकिलांनी बचावाचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद संपला असून, आता उद्या न्यायालय खटल्याच्या निकालाची तारीख जाहीर करणार आहे. 

२८ सप्टेंबर २००२ रोजी रात्री झालेल्या या अपघातात, एकाचा मृत्यू झाला होता तर चार जण जखमी झाले होते. मरण पावलेली व्यक्ती सलमानच्या गाडीनं चिरडल्यामुळं नाही तर क्रेन पडून मृत्यू पावल्याचा युक्तीवाद, सलमानच्या वकिलांनी केला होता. 

त्यामुळं या खटल्याला नवी दिशा मिळालीय. दरम्यान सलमानच्या गाडीच्या चालकानंही, अपघातावेळी आपणच गाडी चालवत असल्याची साक्ष न्यायालयाला दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.