भारतीय पुरुष संघाची ब्राझील संघावर मात, खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत बघायला मिळाली संघर्षपूर्ण लढत

Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने ब्राझील संघावर 64-34 असा विजय मिळवला.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 15, 2025, 08:25 AM IST
भारतीय पुरुष संघाची ब्राझील संघावर मात, खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत बघायला मिळाली संघर्षपूर्ण लढत  title=

Team India Outclass Brazil: इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत खो खो जागतिक विश्वचषक 2025 (Kho Kho World Cup 2025) दोन्ही संघांनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. ब्राझील संघाने सुरेख सुरुवात करत भारत विरुद्ध 16 गुणांची कमाई केली.पण भारत संघाने जोरदार कमबॅक केले. अखेर ब्राझील संघाने आपली ड्रीम रन पूर्ण करत दोन गुण प्राप्त केले. 

कसं झालं दुसरं सत्र? 

दुसऱ्या सत्रात भारताच्या रॉकसन सिंग, पाबनी साबर, आदित्य गणपुले यांनी सुरेख खेळ करत संघाला 36 गुणांची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सत्रात मात्र, ब्राझील संघाने जोरदार खेळ केला. मौरो पिंटो, जोएल रोड्रिक्स व खास करून मॅथ्यूस कोस्टा यांनी संघाचे आव्हान कायम ठेवले.  सामना संपण्यास सात मिनिटे शिल्लक असताना सामना 38-34 अशा स्थितीत होता. 

अखेरचा क्षण 

अखेरच्या क्षणी भारताच्या आदित्य गणपुले आणि कर्णधार प्रतीक वाईकर यांनी संघाला आघाडीवर नेले. तर रॉकसन सिंगने स्कायडाईव्ह द्वारे चार गुण, मेहुलने टचलाईन द्वारे दोन गुणांची कमाई करताना संघाचा विजय सुकर केला. 

 

सामन्यातील इतर पारितोषिके 

  • सर्वोत्तम आक्रमक खेळाडू: पाबरी साबर 
  • सर्वोत्तम बचाव पटू: मॅथ्यूस कोस्टा
  • सामनावीर : प्रतीक वाईकर